१७ वर्षीय मुलीला पळवून नेणाऱ्या भादोल्याच्या तरुणाला अटक!
Aug 6, 2025, 08:37 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संबंधित मुलगी काही दिवसांपूर्वी आजीच्या घरी गेली होती. मात्र ६ जून रोजी सायंकाळी ती कुणालाही काही न सांगता निघून गेली. मोबाईल नसल्यामुळे नातेवाइकांना तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर तिच्या काकांनी सर्वत्र चौकशी केली, परंतु ती कुठेही मिळून आली नाही.
अखेर १० जून रोजी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासदरम्यान पोलिसांना मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली. संशयिताचे नाव सुधाकर गजानन निकम (रा. भादोला) असे आहे.
पोलिस उपनिरीक्षक शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर निकम याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १३७ (२), बीएनआरएस ६४(२), (एफ), (एम), तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४,५ (एल) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत