

आते भावाकडून मामाच्या पोरीचा विनयभंग! मामाची पोरगी सातवीतच... चिखलीची घटना! पोलिस ऑन स्पॉट पोहचले
Apr 24, 2025, 09:33 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मामाच्या पोरीचा आतेभावाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. चिखली शहरात हा प्रकार समोर आलाय. पोलिसांना माहिती दिल्यानंतर एफआयआर ऑन दि स्फॉट या उपक्रमांतर्गत पोलीस पीडित मुलीची तक्रार घ्यायला तिच्या घरी पोहचले. पोलिसांनी तक्रारीवरून पीडित तरुणीच्या आते भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ही सातवीत शिक्षण घेत आहे. वडिलांकडेच तिची आत्या आणि आजीदेखील राहतात. पीडितेचा आतेभाऊ स्वराज हा वाईट उद्देशाने स्पर्श करतो आणि याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देतो, अशी तक्रार मुलीने केली होती. ही बाब तिची आजी आणि आत्याला सांगितल्यावर त्यांनी तिला उलट लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान, तक्रार प्राप्त होताच चिखली पोलिसांनी एफआयआर ऑन द स्पॉट उपक्रमांतर्गत पीडितेच्या घरी जाऊन तिची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आतेभाऊ अनंता (नाव बदलले आहे)विरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.