इंस्टाग्राम वर झालं प्रेम; नंतर शेगावात येऊन लॉजवर 'सगळं काही" केलं! ब्रेकअप झाल्यावर तिला कळलं सत्य...! आता पोलिसांत धाव

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगावात अनेक लॉज केवळ "त्या" कामासाठीच आहे की काय? असा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो.. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. शेगावातील अनेक लॉज वर बलात्काराच्या घटना झाल्याचे उजेडात आले आहे. आता एका २३ वर्षीय तरुणीने शेगावातील एका लॉजवर आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे..या प्रकरणातील आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी आहे..विशेष म्हणजे, तरुणीने ज्याच्या विरोधात तक्रार दिली तो तिचा आधीचा प्रियकर होता.. पण आता त्यांचा ब्रेकअप झालेला आहे..
  तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचे नाव विकास यामे असे आहे. त्याची अन् तिची इंस्टाग्राम वर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले..त्याने तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जून २०२४ ला तो तिला घेऊन शेगावात आला. तिथे त्याने तिला एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये देखील त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
काम आटोपल्यावर...
दरम्यान डिसेंबर महिन्यानंतर त्याने तिचा फोन उचलला नाही. त्याने तिच्यासोबत संपर्क तोडला. त्यानंतर तो विश्वास घातकी असल्याचे सत्य तिला का आली. त्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक उपभोग घेतल्याची सत्यता कळल्यानंतर तिने आता शेगाव पोलिसांत धाव घेतली आहे..पोलिसांनी आरोपी विकास विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..