लाज सोडली; नवरा आणि सासरा निघाला हैवान; तिच्या नवऱ्यादेखत सासरा तिच्याशी करत होता चुकीचे काम..वेगवेगळ्या पुरुषांशी करायला लावायचा भलतेच....

 
 पुणे(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक आणि संताप जनक बातमी समोर आली आहे. बापाच्या वयाच्या असलेल्या महिलेच्या सासर्‍यानेच महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पीडित विवाहित महिलेच्या नवऱ्याच्या संमतीनेच हे कुकर्म होत असल्याचे समोर आले आहे.एवढेच नाहीतर आरोपींनी महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास देखील भाग पाडले आहे..
प्राप्त माहितीनुसार पीडित विवाहित महिला पिंपरी चिंचवड येथील भोसरी भागात राहते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. विवाहित महिलेच्या पतीच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार होत होता. हा प्रकार एकदा नाही तर वारंवार होत असल्याचेही पिडीत विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे.
  या भयंकर घटनेतील नवरा आणि सासरा एवढ्यावर थांबले नाहीत. त्या नराधमांनी एका डेटिंग ॲपवर पीडित महिलेची बनावट प्रोफाइल तयार केली.त्या माध्यमातून महिलेला वेश्या व्यवसायात ढकलत तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले. महिलेने देह विक्रीचा व्यवसाय करण्यास नकार दिला असता तिला सासऱ्याने आणि नवऱ्याने बेदम मारहाण केली. विवाहित महिने या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली, दरम्यान त्यानंतर आरोपींनी हद्दपार करीत पिडीत महिलेला घराबाहेर हाकलून लावल्याने ती मुलांसह आता उघड्यावर आली आहे.. या प्रकरणात भोसरी पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेच्या नवऱ्याविरुद्ध व सासऱ्याविरुद्ध बलात्कार व देह विक्रीचा व्यवसाय करून घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.