लाज सोडली; ३२ वर्षाच्या नराधमाची ६ वर्षांच्या चिमुकलीवर वाईट नजर! संग्रामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :संग्रामपूर  तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय युवकाने ६ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची  घटना  उघडकीस आली. याप्रकरणी पिडतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित बालिकेच्या वडिलांनी तातडीने तामगाव पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी नागोराव दयाराम अढाव (३२) याच्याविरुद्ध कलम ७४, ७५, ३५२ भारतीय न्याय संहिता सहकलम ८, १२ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विलास बोपटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.