LCB ची उदयनगरात धडक! २५ वर्षाच पोरगं घरातून विकत होतं गांजा! ११ किलो गांजा जप्त....
May 29, 2025, 08:39 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील उदयनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. एका घरातून ११ किलो २० ग्रॅम गांजा जप्त केला, ज्याची बाजारभावानुसार किंमत ११ लाख रुपये एवढी आहे.उदयनगर येथील वार्ड नंबर ४ मधील महेश राजेंद्र महानकार (२५) याच्या घरातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी महेशला देखील अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी महेश महानकार हा त्याच्या राहत्या घरातून गांजा विक्री करत होता. त्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली होती. काल,२८ मे च्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी महेशच्या घरी झडप घातली, घरात शोधल्यानंतर ११ किलो २० ग्रॅम एवढा गांजा मिळून आला. आरोपी विरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने एपीआय संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वातील पोहेकॉ गणेश पाटील, पोहेकॉ चांद शेख, पोना युवराज राठोड, पोकॉ
दीपक वायाळ,पोकॉ विजेता पवार, पोकॉ ऋषिकेश थुट्टे , पोकॉ हर्षल जाधव, मपोकॉ दिपाली चव्हाण,पोकॉ निवृत्ती पुंड,पोकॉ कैलास ठोंबरे या पथकाने ही कारवाई केली.