पोलीसांच्या तत्परतेमुळे अपहरणाचा डाव फसला! अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; तीन युवक बोरखेडी पोलिसांच्या ताब्यात...
मलकापूर येथील एका अल्पवयीन मुलीचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला घेऊन बुलढाणा कडे जात असताना मोताळा जवळ त्यांच्या कारचे टायर फुटले. दरम्यान बोरखेडी येथील दोघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. बुलढाणा रोडवर असलेल्या मिर्झा ब्रदर्स समोर त्यांचा कारचे टायर फुटले. अपहरण करणाऱ्या युवकांनी कार तिथेच सोडून पळ काढला.मात्र त्यांच्या मार्गावर असलेल्या बोरखेडी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. जमावाने त्यांची गाडी तोडफोड करून जाळून टाकली तसेच पोलीस ठाण्यात देखील मोठा जमाव झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अपहरण करणारे युवक बीड जिल्ह्यातील असल्याचे समजते.दरम्यान, पोलिस तपासात या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. दरम्यान आरोपींना मलकापूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.बोरखेडी येते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.