बसप्रवासात दोन महिलांकडून दागिने लंपास; देऊळगाव राजात २ लाखांची चोरी !
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १९० मण्यांची सुमारे ३ तोळे वजनाची सोन्याची पोत (किंमत अंदाजे ७५ हजार रुपये) तसेच १७ नग गोल डब्यांच्या पुतळ्यांसह सुमारे ५ तोळे वजनाचे दागिने (किंमत अंदाजे १ लाख २५ हजार रुपये) यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ६२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार नारायण गिते यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी ब्रम्हा गिरी व मिंड यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, बसप्रवासादरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अशा प्रकारच्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.