इसोलीच्या शेख आवेशची आक्षेपार्ह पोस्ट..! दोन गटांत तणाव....

 
 अमडापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इंस्टाग्राम वर धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने इसोली गावात तणाव निर्माण झाला..एका गटाने दुसऱ्या गटातील चार तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.
 
   दोन गटांत जुंपल्याची माहिती समजताच अमडापूर पोलीस तत्काळ गावात दाखल झाले. दोन्ही गटांतील जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शेख आवेश शेख बब्बू याने इन्स्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. विशाल शिवदास कोकाटेसह काही जणांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी वाद निवळला. मात्र, त्यानंतर रात्री दहा, सव्वादहाच्या सुमारास आरोपी शेख आवेश शेख बब्बू, सादिक पठाण, साहिल खान सादिक खान पठाण, परवेझ पटेल रशीद पटेल, शहादतखाँ रसूलखाँ पठाण, शेख शकील शेख शफिक, सादिकखाँ याकूब खान पठाण, शेख समीर शेख शफिक, शेख इरफान शेख फकीरा यांनी विशाल कोकाटेसह चार युवकांना मारहाण केली.
हे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या गटानेही पोलिसांत तक्रार दिल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य पाहता अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, अमडापूरचे ठाणेदार निखिल निर्मल यांनी शांतता समितीची सभा घेऊन शांततेचे आवाहन केले....