सत्ताधारी शिवसेनेचा वचक राहिला नाही का?उपजिल्हाप्रमुखावर आली जलसमाधी घेण्याची वेळ! वारंवार आंदोलन करूनही अवैध रेती उपसा थांबत नाही! संतोष भुतेकर घेणार जलसमाधी

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, याशिवाय अनेक मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला आहेत, शिवसेना सत्तेतील अतिशय महत्त्वाचा पक्ष आहे..मात्र असे असूनही शिवसेनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना अधिकारी जुमानायला तयार नाहीत.. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आहेत, ते केंद्रीय मंत्री देखील आहेत. जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचा १ आमदार आहे, जिल्ह्यातल्या ७ पैकी ६ मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. मात्र एवढी असून देखील अधिकाऱ्यांवर वचक नाही की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर अवैद रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या विरोधात वारंवार आंदोलने करतात मात्र केवळ पेपरात छापून येण्यापूरती कारवाई होते आणि पुन्हा अवैध रेती वाहतूक जैसे ते सुरू होते.. सततच्या या प्रकाराला आता संतोष भुतेकर वैतागले आहेत, आता अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात त्यांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.. "अधिकारी ऐकायला तयार नसतील तर मी आता थेट खडक पूर्ण प्रकल्पात जलसमाधीच घेतो" असा थेट इशारास त्यांनी देऊन टाकला आहे. त्यासंबंधीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे..त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही की काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
  खडकपूर्णा प्रकल्पातून देऊळगावराजा , बुलडाणा, सिंदखेड राजा शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र या प्रकल्पातून करोडो रुपयांची गौण खनिज चोरी होत आहे. दररोज रात्री तीनशे ते साडेतीनशे टिप्पर रस्त्यावरून अवैध रेती वाहतूक करत सुसाट सुटतात..
मात्र यावर महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा भुतेकर यांचा आरोप आहे. अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात भुतेकर यांचा लढा कित्येक दिवसांपासून सुरू आहे, मात्र खातून मातुर कारवाई व्यतिरिक्त ठोस असे काहीच झालेले नाही. त्यामुळे एकतर रेती उपसा अधिकृत करा नाहीतर अनधिकृत चाललेला रेती उपसा तात्काळ बंद करा अशी भुतेकर यांची मागणी आहे. अवैध रेती उपसा व वाहतुकीला बळ देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशीदेखील मागणी संतोष भुतेकर यांनी आयुक्तांकडे रेटली आहे. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास २२ एप्रिलला संतोष भुतेकर खडकपूर्णा प्रकल्पातच जलसमाधी घेणार आहेत...