गृहमंत्री झोपलेत का? सत्ताधाऱ्यांच्या पाठबळामुळेच गुन्हेगार सैराट! पोलिसाचा बळी कुणाच्या जबाबदारीवर? काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा सवाल..

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गृहमंत्र्यांचा यंत्रणेवर वचक नाही..हे सरकार गुन्हेगारांना आशीर्वाद देणारे सरकार आहे.त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे.. गुन्हेगारांना शरण देण्याच्या सरकारच्या धोरणामुळेच पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. शेळगाव आटोळ जवळ कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी भागवत गिरी यांचा अवैध दारू विक्रेत्याकडून खून होतो..मात्र सत्ताधारी गप्प आहेत. गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्यानेच त्यांची एवढी हिंमत वाढली आहे असा हल्लाबोल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला आहे.
  राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. वसुलीसाठी गृहखाते त्यांनी त्यांच्याकडे ठेवले असल्याचा गंभीर आरोपही राहुल बोंद्रे यांनी केला. अवैध धंद्यावाल्यांना प्रोत्साहन दिले नसते तर भागवत गिरी यांचा बळी गेला नसता. इथे पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? गृहमंत्री झोपलेत का? असा सवाल करीत शाहिद पोलिसाला न्याय मिळाला पाहिजे असेही राहुल बोंद्रे म्हणाले..