अंथरुणात मण्यार जातीचा विषारी साप निघाला; ५ वर्षीय बालकाचा मृत्यू. इसरूळ येथील घटना!

 
 इसरुळ(ऋषि भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ५ वर्षीय बालक हा आपल्या घरात आईं वडिलांच्या सोबत अंथरूनावर झोपलेला असतांना भारतातील सर्वात विषारीसापापैकी एक असलेल्या "मण्यार" या जातीच्या सापाने शेख मेहबूब शेख गफूर यांच्या लहान मुलास चावा घेतल्याने त्याचा अवघ्या २ तासात दुर्दैवी असा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी इसरुळ येथे घडली.

 अत्यंत गरीब परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालवत असलेले शेख महेबूब शेख गफूर नेहमीप्रमाणे घरामध्ये खाली अंथरूण टाकून त्यांचा ५ वर्षीय मुलगा अल्तमास व ते एकाच गोधडीवर झोपलेले होते. साडेपाच वाजेच्या दरम्यान त्यांना त्यांच्या मुलाच्या रडण्याने जाग आली. उठून पहाले असता त्यांना अंथुरणावर तो साप दिसला. मुलाला कुठे साप चावला का म्हणुन त्याचे निशाण शोधले असता त्यांना दिसून आले नाही. लगेच त्या सापास मारून सोबत घेऊन मुलाला उपचारासाठी चिखली येथे प्रथम डॉ.दळवी, डॉ. धनवे व नंतर योगीराज हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले परंतू साप खूपच विषारी असल्याने व सकाळचा वेळ असल्यामुळे त्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्या बालकाच्या दुर्दैवी असा अंत झाला.ह्या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.