खडकपूर्णा धरणात अवैध मासेमारी भोवली; चार जणांवर गुन्हा दाखल; पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांची धडक कारवाई !
या छाप्यात आरोपी परमेश्वर दशरथ दुंडियार, संतोष राजू चिंधोटे, भगवान रामकिसन चिंधोटे, विष्णू बन्सी बिलगे (सर्व रा. कुंभारझरी, ता. जाफराबाद, जि. जालना) हे चोरीछुप्या मार्गाने अवैधरित्या मत्स्यमारी करताना रंगेहाथ आढळून आले.
या प्रकरणी अनिल कौतिकराव वायाळ, अध्यक्ष, खडकपूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, रा. चिंचखेड यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित चारही आरोपींविरुद्ध मत्स्य चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत 90 हजार रुपयांचे मासे लंपास केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.
दरम्यान, खडकपूर्णा धरण परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
