आठवीच्या विद्यार्थ्यांसोबत "तसं" करतांना लाज नाही वाटली! लहानग्या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; देऊळघाट हादरले...शेतात नेऊन...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेमुळे समाजमनातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे..बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन यासंदर्भात पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार दिली आहे..

प्राप्त माहितीनुसार आरोपी आणि पीडित एकाच समाजाचे आहेत. पीडित मुलाचे वडील व्यावसायिक आहे. पीडित मुलगा देऊळघाट येथील एका शाळेत आठव्या वर्गात शिकतो. सैय्यद जुनेद सय्यद बब्बू असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा देऊळघाट येथीलच राहणारा असून पीडित मुलाची आणि त्याची ओळख आहे..या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी जुनेदने मुलासोबत कुकर्म केले.
पीडित मुलगा खेळत असताना आरोपी जुनेद याने मुलाला शेतात नेले. तिथे मुलावर लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मात्र वेदना होत असल्याने पीडित मुलाने कुटुंबीयांना ही बाब सांगितली, त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी जुनेद विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलिस करीत आहेत..