ऍसिडिटी चे औषध म्हणून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या! मग उशी तोंडावर दाबून घेतला बायकोचा जीव;

 दाभाडी मर्डर प्रकरणात दरोड्याचा बनाव करणारा डॉक्टरच निघाला आरोपी; अनैतिक संबंधात अडसर ठरत होती म्हणून रचला कट.....
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या दाभाडी मर्डर प्रकरणाचा खुलासा अखेर झाला आहे... स्वतः डॉ.गजानन टेकाळे यानेच पत्नी माधुरीचा जीव घेतल्याचा खुलासा झाला आहे. बायकोचा खून करून गजाननने घरी दरोडा पडल्याचा बनाव केला, मात्र आता हा संपूर्ण प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी गजानन ला अटक केली आहे.. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने डॉ. गजाननने पत्नी माधुरीचा जीव घेतल्याचे उघड झाले आहे..डॉ. गजाननने पत्नी माधुरीला ऍसिडिटीच्या औषधाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि नंतर उशिने तोंड दाबून हत्या केली...
   १९ जानेवारीच्या सकाळी दाभाडी येथे कथित दरोडा पडल्याचा प्रकार उजेडात आला होता. यात सौ. माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी टेकाळे यांच्या घरी दरोडा पडला असावा आणि दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सौ.माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला असावा अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या.. मात्र पोलिसांच्या तपासात दरोड्याचा बनाव स्वतः डॉक्टरनेच रचल्याचे समोर आले आहे...
नेमके काय घडले...
डॉ. गजानन टेकाळे हा पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. त्याचे पत्नी माधुरीच्या नात्यातील एका तरुणीशी अनैतिक संबंध होते..गेल्या ५ ते ६ हे संबंध होते. दरम्यान आता तरुणीवर तिच्या कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव वाढत होता.. त्यामुळे ती तरुणी देखील डॉक्टर वर लग्नासाठी दबाव टाकत होती.. त्यामुळे आता नेमके काय करायचे या विचारात डॉक्टर होतात. पत्नी माधुरीचा खून करायचा आणि नंतर तरुणीशी लग्न करायचे असा विचार डॉक्टरच्या डोक्यात होता..त्यासाठी डॉक्टरने प्लॅन रचला..त्यानुसार त्याने घरी झोपेच्या गोळ्यांचे पाकीट आणले..१८ जानेवारीच्या दुपारीच ऍसिडिटीच्या चूर्णाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा भुगा करून पत्नी माधुरीला दिला. यामुळे माधुरीला गाढ झोप लागली..१८ जानेवारीच्या सायंकाळी गजानन ने पत्नीला उठवले, दोघांनी सोबत जेवण केले..मात्र पत्नी माधुरी झोपेच्या गुंगीत होती.. माधुरी पुन्हा झोपली..रात्री १० वाजेच्या सुमारास गाढ झोपलेल्या माधुरीच्या तोंडावर उशी दाबून गजानन ने माधुरीचा जीव घेतला.. थोड्या वेळानंतर या प्रकारातून स्वतःचा बचाव कसा करायचा याचा विचार डॉक्टरच्या डोक्यात शिरला..त्यासाठी त्याने दरोड्याचा बनाव केला.. घरातील कपाट अस्ताव्यस्त केले, पत्नीचे दागिने लपवून ठेवले आणि स्वतः भरपूर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपून गेला..दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना माधुरी मृत अवस्थेत तर गजानन अस्वस्थ अवस्थेत दिसला..१९ जानेवारीपासून डॉक्टर गजानन दवाखान्यात उपचार घेत होता.. काल दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी गजाननला ताब्यात घेतले. पोलिसांकडे आधीच गजानन चा मोबाईल , त्यामधील नको त्या अवस्थेतील फोटो यामुळे पुरावे गोळा झाले होते..अखेर आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून गजानन ने पत्नीचा खून केल्याचे उघड झाले आहे...