बीपी च्या २०० गोळ्या खाल्ल्या! २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू! नांदुरा तालुक्यातील धक्कादायक घटना
 Apr 24, 2025, 09:36 IST
                                            
                                        
                                      नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील एका २५ वर्षीय तरुणाने बीपीच्या दोनशे गोळ्या खावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवन महादेव गव्हाळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 पवन गव्हाळे याने बीपीच्या २०० गोळ्या खाल्ल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान २३ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. कक्षसेवक सुदाम वसाने यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पवनने एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या सेवन करून आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.
 
                                    