शेतात सोंगुन ठेवलेली तूर नेली चोरुन..! मेहकरच्या उकळी सुकळी शिवारातील घटना....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात सोंगुन ठेवलेली अर्थात कापणी केलेली तूर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी शिवारात हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे...

  रामेश्वर कुंडलिक घनवट (४०) रा. परतापुर ता.मेहकर यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. त्यांची उकळी सुकळी शिवारात शेती आहे. त्यांनी चार एकर शेतीतील तूर सोंगून ठेवलेली होती. दरम्यान एका रात्रीतून सोंगून ठेवलेल्या तुरीची शेतातच मळणी करून कुणीतरी अज्ञात भामट्याने चोरून दिली. यामुळे शेतकऱ्याचे २८ हजार रुपयांची नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे...