"माझ्यात जाळून टाकण्याची ताकद, विझजवण्याची नाही!" चिखली– खामगाव रोडवरील पेठ चे मॅटर काय? दोन शेळकेंमध्ये चेतवल्यावरून चेतले...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली खामगाव रोडवर असलेल्या पेठ मधील दोन शेतकऱ्यांचा वाद पेटवा पेटवीवरून पेटला. त्यापैकी एकाने अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रारही दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप रामदास शेळके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शंकर दिलीप शेळके (३५, रा
पेठ) या शेतकऱ्याने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार शंकर शेळके आणि संदीप शेळके यांचे गट नंबर १८३ मध्ये धुर्‍याला लागून शेत आहे. दोघांचा धुरा सामाईक आहे. शंकर दिलीप शेळके यांना शेतात टोमॅटो लावायचे होते त्यामुळे त्यांनी ठिबकच्या १५ नळ्याचे बंडल व बांबूचे १००० तुकडे सामायिक धुर्‍यावर ठेवले होते.
धुरा चेतला....
   दरम्यान संदीप शेळके यांनी त्यांच्या शेतातील गव्हाचे काड चेतवले. त्यामुळे शंकर दिलीप शेळके याने सामायिक धुऱ्यावर ठेवलेले ठिबकच्या १५ नळ्याचे बंडल व बांबूचे १००० तुकडे , ४ पाईप असे साहित्य जळून खाक झाले. हे साहित्य जाणीवपूर्वक जाळले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान यावेळी शंकरचे वडील दिलीप शेळके संदीप शेळके यांना म्हणाले की तू काड चेतवले आहे, धूऱ्याकडे लक्ष ठेव, त्यावर माझ्यात जाळून टाकण्याची ताकद आहे, विझजवण्याची नाही.. तुमच्याकडून काय होते ते तुम्ही करून घ्या असे संदीप रामदास शेळके म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय संदीप शेळके याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संदीप शेळके विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...