आज नको ना..उद्या करूयात..! व्रताचे कारण सांगून टाळत होता शारीरिक संबंध! समलिंगी नात्याचं गूढ उघड होताच रक्तरंजित शेवट!; सिंदूर भरून 'पत्नी' मानलेल्या व्यक्तीचं खरं रूप समोर येताच घडलं थरारक कांड!"
गुजरातमधील राजकोट येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकरणात २० वर्षीय पियुष कुमार खरवार याची फेसबुकवर 'निशा कुमार' आणि इन्स्टाग्रामवर 'पूनम' नावाच्या प्रोफाइलशी ओळख झाली. संवाद वाढत गेला आणि दोघे इतके जवळ आले की पियुषने त्या व्यक्तीला पत्नी म्हणून स्वीकारले. धार्मिक विधीनुसार त्याच्या भांगेत सिंदूरही भरला गेला. काही काळ दोघे पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते.
मात्र, या नात्यात एक गोष्ट सतत खटकत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, चंदन कुमार धार्मिक व्रतांचे कारण देत पियुषसोबत शारीरिक संबंध ठेवणे टाळत होता. अखेर एके दिवशी पियुषने त्याला दाढी करताना पाहिलं आणि त्याच्यासमोर धक्कादायक सत्य आलं.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 'निशा कुमार' आणि 'पूनम' या नावाने सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवणारा चंदन कुमार प्रत्यक्षात पुरुष होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तो समलिंगी संबंधांच्या उद्देशाने महिला ओळख वापरत होता. हे वास्तव समोर आल्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाले आणि पियुष तेथून निघून गेला.
मात्र, चंदनने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमार्गे शोध घेत अखेर त्याने राजकोटमधील पडवाला परिसरातील एका कारखान्यात काम करणाऱ्या पियुषचा शोध लावला.
२१ जून रोजी दोघांची पुन्हा भेट झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर पियुषने चंदनला रेल्वे रुळांलगतच्या निर्जन ठिकाणी नेले. तेथे मोठ्या दगडांनी डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह दगडाखाली लपवून तो पुन्हा आपल्या कामाच्या शिफ्टवर परतल्याची माहिती तपासात समोर आली आहे.२५ जून रोजी मस्कत फाटक रेल्वे परिसरात महिलांचे कपडे घातलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह आढळला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असावा, असा अंदाज होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापती आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी पियुष कुमार खरवार याच्यापर्यंत धागेदोरे पोहोचवले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.राजकोट ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयसिंह गुर्जर यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.