चिखलीचे डॉ.गोसावी म्हणतात, "मी तसं केलंच नाही, कुणीतरी व्हिडिओ एडीट केला म्हणाले!" इंस्टाग्राम वर झाला होता "तसला" व्हिडिओ व्हायरल...

 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील एका डॉक्टरचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान आता याप्रकरणी डॉक्टरने सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. "व्हायरल व्हिडिओ दिसत असलेले कोणतेही कृत्य मी केलेले नाही. कुणीतरी बदनामी करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही फुटेज कॉपी करून त्यानंतर व्हिडिओ एडिट केलेला आहे." असे डॉ.गोसावी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे..
  काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तक्रारदार डॉक्टर एका महिलेसोबत केबिनमध्ये अश्लील चाळे करीत असल्याचे दिसत होते. मात्र आता याप्रकरणी डॉक्टरांनी कायदेशीर हत्यार उपसले आहे. डॉ.गोसावी यांनी बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देत व्हिडिओ एडिट आणि व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सदर व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड होत आहे, मित्रमंडळींमध्ये व्हायरल होत आहे , त्यामुळे आपली व पीडित महिलेची बदनामी होत आहे असे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले आहे. व्हिडिओत दिसते तसे कोणतेही कृत्य मी महिलेसोबत केलेले नाही, परंतु कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मला बदनाम करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ क्लिप चोरून कॉपी करून नंतर त्यात एडिटिंग केली असल्याचे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या ज्या इंस्टाग्राम अकाउंट वरून सदर व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या लिंक देखील डॉक्टरांनी सायबर पोलिसांना दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास बुलढाणा सायबर पोलीस करीत आहेत...