धुक्यामुळे समोर काहीच दिसलं नाही! ट्रक आणि ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्या; किनगाव जट्टु जवळ आज सकाळी अपघात....
Dec 30, 2024, 09:14 IST
बिबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आज,३० डिसेंबरच्या पहाटे सर्वत्र धुके पसरले. दरम्यान या धुक्यामुळे अनेक वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला. बिबी पोलीस स्टेशन हद्दीत या धुक्यामुळेच एक अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि गुरे घेऊन जाणारा जाणारा आयशर ट्रक समोरासमोर धडकून हा अपघात झाला..
प्राप्त माहितीनुसार किनगाव जट्टु ते लोणार दरम्यान किनगाव जट्टु येथील शिक्षक कॉलनीजवळ हा अपघात झाला. ट्रॅव्हल पुण्याकडून नांदेड कडे जात होती तर आयशर ट्रक बाजारासाठी गुरे घेऊन विरुद्ध दिशेने येत होते. धुक्यामुळे चालकाला समोरील अंदाज आला नाही, त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांवर आदळली. यात दोन्ही वाहनांमधील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी बीबी पोलिसांनी पोहचून वाहतूक सुरळीत केली.