बायकोच्या चारित्र्यावर नवऱ्याचा संशय! वैतागलेल्या बायकोने उचलले टोकाचे पाऊल! शेगावची घटना.......

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नानंतर विवाहितांचे कौटुंबिक छळ होत असल्याची प्रकरणे वाढले आहेत. अनेक विवाहिता आपल्या तक्रारी घेऊन भरोसा सेल मध्ये जातात, तिथे समजूतीने प्रकरण मिटवण्यावर भर दिला जातो. मात्र तिथेही प्रकरण मिटले नाही तर मात्र पोलिसांत प्रकरण दाखल होते. आता संतनगरी शेगाव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आले आहे.. नवरा बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, मारहाण करायचा..आता वैतागून बायकोने पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी प्रवीण खाडे (२८, रा. पंचशील नगर शेगाव) असे तक्रारदार विवाहितेचे आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला नवऱ्याने प्रचंड त्रास दिला. तुझ्या वडिलांकडून टू व्हीलर आणि प्लॉट घेण्यासाठी ३ लाख रुपये आण नाहीतर फारकती देतो अशी धमकी तिचा नवरा प्रवीण खाडे तिला देत होता. तिच्या चरित्रावर वारंवार संशय देखील घ्यायचा. रोज टॉर्चर करायचा...अखेर तिला त्रास असह्य झाला. त्यावरून तिने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह सासू आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....