बायको प्रेग्नेंट झाली म्हणून नवऱ्यावर गुन्हा! एकच नाही चौघे अडकले! असं कसं होऊ शकतं? खामगाव तालुक्यातील नेमके मॅटर काय?
May 23, 2025, 10:37 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बायको ९ महिन्यांची प्रेग्नेंट... प्रसवकळा सुरू झाल्या...घरात बाळ येणार असल्याने तसा आनंदी आनंदच होता..प्रसूतीसाठी त्याने व कुटुंबीयांनी तिला खामगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले..मात्र इथेच घोळ झाला..काही क्षणात आनंदावर विरजण पडलं.. मॅटर पोलिसांत गेल्यानंतर धक्कादायक बाब उघड झाली आणि गर्भवती मुलीच्या पतीसह तिच्या सासऱ्यावर आणि तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला..
जळगाव जामोद माहेर असलेल्या एका नऊ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेला प्रसूतीसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मुलीला तपासल्यानंतर मुलीचे वय केवळ अठरा वर्षे एक महिना असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. विवाहिता अल्पवयीन असतांनाच तिच्यावर मातृत्व लादल्याची बाब समोर आली. शिवाय अल्पवयीन असतानाच तिचे लग्न लावून दिल्याचेही उघड झाले..यामुळे खामगाव शहर पोलिसांनी विवाहित मुलीचा पती, सासरा आणि वडिलांसह चौघांवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे...