थरार.. अजगराने केली बकरीची शिकार! लेकरू वाचवा वाचवा म्हणत होत पण...व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल! पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण... खामगावची घटना
Jun 6, 2026, 21:05 IST
खामगाव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव च्या बोरडी नदी परिसरात एका अजगराने थरारक घटना घडवून आणली आहे. त्याने चक्क बकरीची शिकार केली आहे..यावेळी नदी काठावर उपस्थित एकाने त्याचा व्हिडिओ काढला, सर्पमित्रालाही बोलवण्याचा प्रयत्न झाला..मात्र बकरीला वाचवता आले नाही..यावेळी तिथे उपस्थित एक लहान लेकरू ते दृश्य पाहून वाचवा वाचवा म्हणत होत, पण अजगराच्या तडाख्यातून बकरीच्या पिल्लाला वाचवता आले नाही..
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खामगाव च्या शेवाडी येथील रहिवासी अजिंक्य शेजवळ हे बोरडी नदीच्या काठावर बकऱ्या चारत होते. त्याचवेळी नदी काठावर असलेल्या एका जसगराने बकरीच्या पिल्लावर झडप घेतली.. अजगर आणि पिल्लाला पोटात ओढले.. गुदमरून पिल्याचा जागीच मृत्यू झाला..
काही वेळानंतर या अजगर आणि पिल्लाला पुन्हा पोटातून बाहेर फेकले मात्र तोपर्यंत बकरीच्या पिल्याचा मृत्यू झाला होता. याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या अजय वाघमारे यांनी हा संपूर्ण थरार त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केला.. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली असून नागरिकांनी घाबरून न जाता अजगर किंवा इतर वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.