बेराळा फाट्यावर भीषण अपघात ! एसटी बसने दुचाकीला उडवले! पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी..

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील बेराळा फाट्यावर आज,२३ फेब्रुवारीच्या सकाळी भीषण अपघात झाला. जांभोरा येथे जाणाऱ्या केळवद येथील दांपत्याच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिली. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. 
संजय पांडुरंग गायकवाड (५८) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी शीला गायकवाड या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार संभाजीनगर वरून हिंगणघाटकडे जाणारी बस चिखलीकडे येत होती. त्याचवेळी केळवद येथील संजय गायकवाड हे पत्नीसह दुचाकीने रस्ता ओलांडून येवत्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी भरधाव बसने दुचाकीला उडवले. अपघातात संजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..