गच्चीवर झोपायला गेले अन् खाली मृतदेहच पडला! देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भाई शिवारात धक्कादायक घटना

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घराच्या छतावर झोपायला गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गच्चीवरून खाली पडला. देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई शिवारात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...दत्तात्रय नारायण डोनगहू असे मृतक व्यक्तीचे नाव आहे....

 दत्तात्रय डोनगहू हे नेहमीप्रमाणे घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. गच्चीवर जातांना त्यांना अचानक विजेचा जबर शॉक लागला. शॉक लागल्याने ते छतावरून खाली पडले, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत....