प्रेग्नेंट बायकोला भेटायला सासुरवाडीत यायचा; शेजारच्या तरुणीवर जीव जडला, पत्नीच्या डिलिव्हरीपूर्वीच पळून गेला!

 
 चिखली (बुलडाणा बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील एका गावात खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुण आपल्या गरोदर पत्नीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी वारंवार भेटी द्यायचा . अशातच सासुरवाडी शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवरच त्याच प्रेम जडलं.

सुरुवातीला साध्या ओळखीतून सुरू झालेलं हे नातं लवकरच प्रेमसंबंधात रूपांतरित झालं. दरम्यान त्याची पत्नी अजूनही माहेरीच राहात होती आणि तिची डिलिव्हरी काही आठवड्यांवर येऊन ठेपली होती.
  मात्र, पत्नीच्या डिलिव्हरीची वाट न पाहता, संबंधित तरुणाने थेट सासुरवाडीतूनच शेजारील तरुणीसोबत पलायन केलं. काही दिवसांनंतर या दोघांनी लग्न केल्याची माहिती आता समोर आली आहे.
या प्रकारामुळे गावात चांगलीच चर्चा रंगली असून, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर या घटनेची तीव्र दखल घेतली जात आहे. सासरच्या मंडळींना तसेच गर्भवती पत्नीच्या कुटुंबाला या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे.