दुपारी होणाऱ्या पत्नीसोबत लग्नाची खरेदी केली ; संध्याकाळी घेतला टोकाचा निर्णय; लग्नाच्या १२ दिवस आधी असं काय घडलं?

 
 जालना(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाला बारा दिवस बाकी असताना एका तरुणाने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.. विशेष म्हणजे दुपारी लग्नासाठी खरेदी आणि सायंकाळी टोकाचा निर्णय यामुळे ही घटना चर्चेत आली आहे.. राम पांडुरंग धाईत (२७, रा. डोमेगाव, ता.अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकरी पुत्राचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार रामचे लग्न १२ दिवसांवर येऊन ठेपले होते. सगळीकडे लग्नाची खरेदी सुरू होती, एकीकडे लग्नाची धामधूम सुरू असताना रामच्या मनात नेमकं काय सुरू होतो याचा अंदाज कुणाला आला नाही. लग्नाआधीच आयुष्य संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होतं आहे.
रामचे बीएपर्यंत शिक्षण झाले होते. मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी त्याचं लग्न जमलं होतं.१२ एप्रिलला हा लग्न सोहळा पार पडणार होता. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. 
  लग्नाचा बस्ता फाडण्यासाठी राम आणि रामचे कुटुंबीय व नवरी व नवरी कडील मंडळी जालना येथील एका दुकानात आली होती. दिवसभर दोन्ही कुटुंबांनी लग्नाची खरेदी करून सायंकाळी ते आपापल्या घरी परतले. सायंकाळी सात वाजता राम बाहेरून चक्कर मारून येतो असे सांगून घराच्या बाहेर निघाला. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. त्याला फोन केल्यानंतर फोनची रिंग वाजत होती मात्र राम फोन उचलत नव्हता. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली, गावाजवळच्या एका शेतात राम एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेनं कुटुंबीयांचा पायाखालची जमीन सरकली.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..