

जॉब लावून देतो म्हणायचा..शेगावच्या लॉजवर बोलवायचा अन् तिच्याशी करायचा "भलताच जॉब "! २१ वर्षीय तरुणीची पोलिस ठाण्यात तक्रार!
Apr 15, 2025, 09:13 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारी सातत्याने वाढत आहे. विशेषतः बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना गत काळात पोलिस ठाण्यात नोंदवल्या गेल्या आहेत. या घटना शेगावच्या काही लॉजवर होतात..शेगावच्या काही लॉजवर उघडपणे हे धंदे चालतात, मात्र पोलिस काही त्याच्या मुळाशी जातांना दिसत नाहीत..आता शेगावातून पुन्हा एक लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीला जॉब लावून देण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलिस ठाण्यात दिली आहे..
पीडित तरुणी २१ तर आरोपी २४ वर्षांचा आहे. धनजंय संतोष पाटील असे आरोपीचे नाव आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार जॉब लावून देतो असे सांगत आरोपी संतोषने तरुणीशी जवळील साधली. नोकरी लावून द्यायचे कारण सांगून दोघांमध्ये नियमित बोलणे व्हायचे..
मी प्रेम करतो म्हणे..
दरम्यान नोकरीच्या कारणाने आरोपी धनंजयने तरुणीला शेगावात बोलावले. तिथे धनंजय तरुणीला एका लॉजवर घेऊन गेला. "मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करणार आहे " असे म्हणत त्याने तरुणीला प्रपोज केले. त्यानंतर धनंजयने तरुणीशी लॉजसह वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही दिवसांपासून तरुणाचा संपर्क तुटला, नोकरी व लग्न याविषयावर तो आता बोलतही नाही..त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बलात्काराची तक्रार दिली आहे..पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.