दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक: युवकावर कारवाई,२० हजारांचा मुद्देमाल जप्त!
Oct 7, 2025, 12:15 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जयपूर-कोथळी रस्त्यावर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पकडले. या कारवाईत तब्बल २० हजार रुपयांचा अवैध गुटखा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली असून, ६ ऑक्टोबर रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२८ सीडी-०७८३ क्रमांकाच्या दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक केली जात होती. तपासणीदरम्यान शेख शरीफ शेख हमीत (वय २४, रा. कोथळी) हा युवक गुटखा बाळगताना आढळून आला. त्याच्याकडून १९ हजार १०७ रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर पोलिसांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून, पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.