मित्रांनीच केला मित्राचा गेम; चाैघांना केली पाेलिसांनी अटक; शेगावात भर बाजारात चाकूने भाेसकून केली हाेती हत्या !

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील आठवडी बाजारात सायंकाळी पाच वाजता एका ३२ वर्षीय तरूणाची चाकूने भाेसकून हत्या केल्याची घटना २५ ऑक्टाेबर राेजी घडली. दरम्यान, या प्रकरणी पाेलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चार आराेपींना अटक केली आहे. मित्रांनीच मित्रांची हत्या केल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणी शेगाव पाेलिसांनी चार आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

नितीन ऊर्फ गोलू नामदेव गायकवाड (वय ३५, रा. मिलिंदनगर, नागझरी रोड, शेगाव) हा मजुरीचे काम करत होता. आरोपी मोहम्मद शाहीद ऊर्फ बावल्या आणि त्याचे मित्र यांना ‘नितीन दुसऱ्या मुलांसोबत राहतो’, या कारणावरून राग आला होता. अशोक नामदेव गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी व त्याचे मित्र नागझरी रोडवर उपस्थित असताना त्यांनी नितीनला चाकूने मानेवर आणि पोटावर वार करून गंभीर जखमी केले. नितीन काहीही हालचाल करू शकला नाही व घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले. मात्र शेगाव पोलिसांनी काही तासांत शाहरूख ऊर्फ टीन टप्पर, बॉद खान मियान खान बदल्या ऊर्फ तुर्रम , मोहम्मद जावेद मोहम्मद नामीर ऊर्फ मोदी, आरोपी मोहम्मद शाहीद ऊर्फ बावल्या यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.