घरगुती गॅस वाहनामध्ये भरून देणारे चौघेजण LCB च्या जाळ्यात; सिलेंडर, ऑटो रिक्षा सह साहित्य जप्त!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बोरखेडी पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध घरगुती गॅसचा वापर ऑटो रिक्षा मध्ये करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 3 लाख 72 हजार रूपांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगेश रामभाऊ पारस्कर वय (25) रा.आदर्श नगर मोताळा, महादेव निवृत्ती सूर्यधन वय (27) रा.टाकरखेड, शेक अफसर शेख कदीर वय (38) रा.मोताळा, शेख जावेद शेख कबीर वय (35) रा.मोताळा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मोताळा येथील आदर्श नगर येथे मंगेश पारस्कर हा कॉम्प्रेसर मशीन च्या साह्याने घरगुती/ कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षामध्ये भरताना आढळून आला असता त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्यासह इतर तीन जणांना देखील तब्येत घेण्यात आले. त्यांच्याकडून गॅस सिलेंडर, मारुती ECO दोन ऑटो रिक्षा कॉम्प्रेसर मशीन असा एकूण 3 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघां विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोहेकॉ. राजेंद्र अंभोरे, जगदेव टेकाळे, दिगंबर कपाटे, विजय पैठणे, विकास देशमुख यांनी पार पडली.