१७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती...! शेगावला घेऊन गेला अन् ...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात आरोपी हा पिडीत मुलीच्या घराशेजारी राहणारा आहे, त्यामुळे आरोपीचे नाव जाहीर केल्यास पिडीत मुलीची ओळख होऊ शकते, त्यामुळे आम्ही या बातमीत आरोपीचे नाव टाळत आहोत.
 पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचे पिडीत मुलीच्या घरी जाणे येणे होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. २०२१ पासून आरोपी पिडीत मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिला शेगावला घेऊन गेला तिथे त्याने तिची इच्छा नसताना जबरदस्ती हात धरून तिच्यासोबत सेल्फी काढला व तू मला खूप आवडतेस ,मी तुझ्यावर प्रेम करतो असा प्रपोज केला.
दरम्यान मे २०२४ मध्ये आरोपी पुन्हा पिडीत मुलीला भेटला. "मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला खूप आवडते" असे तो मुलीला म्हणाला. सातत्याने असा प्रकार होत असल्याने पिडीत मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी आरोपीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही तो सातत्याने त्रास देत असल्याचे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी पिडीत मुलीच्या सारखा पाठलाग करीत आहे , "मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे" असे आरोपी सातत्याने म्हणत असल्याचा आरोप पिडीत मुलीने तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.