महिलेला फोटो दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध; गुन्हा दाखल; खासगी व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करून केली बदनामी..!

 
डोणगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलीस स्टेशन हद्दीतील डोणगाव येथे एका ३३ वर्षीय महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १ मे २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजल्यापासून ते दिनांक १३ जून २०२५ पर्यंतच्या कालावधीत, डोणगाव येथील आरोपी प्रताप अशोक मानवतकर याने पीडितेला तिचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये ठेवून ते पतीला दाखवण्याची किंवा मुलांना जिवाने मारण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याशिवाय, आरोपी प्रताप मानवतकर याने आपली चुलत बहीण  आणि मेहुणा  यांच्या मदतीने पीडितेचे खासगी व्हिडिओ तिच्या नातलगांना दाखवून तिची बदनामी व मानसिक छळ केला.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी प्रताप अशोक मानवतकर व इतर दोन जणांविरुद्ध दिनांक ८ ऑगस्ट रोजी कलम 64(1), 64(2)(n), 75, 78, 356, 352, 351(2)(3) आणि 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.