चिखलीत अग्नि–तांडव! जयस्तंभ चौक परिसरातील ७–८ दुकाने भस्मसात; हांडगे मामाच्या कचोरी सेंटरचाही समावेश....
Updated: Mar 15, 2026, 16:51 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात आज दुपारी भीषण अग्नि -तांडव पाहायला मिळाले. जस्तंभ चौक परिसरातील ७ ते ८ दुकाने जळून खात झाली आहेत. आग नेमकी कशाने लागली याबाबत अद्याप कारण समोर आलेले नाही.
चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील ७ ते ८ दुकाने आगीने जळून खाक झाले आहेत. सुप्रसिद्ध हांडगे मामा कचोरी सेंटर यासह परिसरातील त्या रांगेतील सर्वच दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. फळांची दुकाने, चपला बुटांची दुकाने, मोबाईल रिपेरिंग ची दुकाने यासह जवळपास सर्वच दुकानांची राखरांगोळी झाली आहे.
अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुकानांची राख रांगोळी झालेली होती. सध्या जेसीबीच्या सहाय्याने दुकाने हटवण्यात येत आहे. या आगीने कोट्यावधी रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज आहे.