मलकापुरात अग्नितांडव! आठवडी बाजारातील दुकानांना भीषण आग; चार ते पाच दुकाने जळून खाक...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापुरातील आठवडी बाजार परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. १३ एप्रिलच्या मध्यरात्री हे थरारक अग्नितांडव घडले. ही आग एवढी भयानक होती की काही वेळातच आगीत चार ते पाच दुकाने दळून खाक झाली.. यामुळे व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.. आग लागलेल्या दुकानांमध्ये किराणा दुकान, मसाले दुकान व दैनंदिन खाद्यपदार्थ अशा चार ते पाच दुकानांचा समावेश आहे..

  मलकापुरातील आठवडी बाजारात १३ एप्रिल च्या मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत आठवडी बाजारातील दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच सजग नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. काही मिनिटातच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र चार ते पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी, नायब तहसीलदार उगले व प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही..