चिखली शहरातील' सीसीएन' कार्यालयाला भीषण आग; २० लाखांचे नुकसान...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील सीसीएन केबल नेटवर्कच्या कार्यालयाला २८ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेमुळे कार्यालयातील केबल्स, बॅटरी आणि इतर उपकरणांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सीसीएन केबल नेटवर्कच्या कार्यालयातील आगीने रौद्र स्वरूप धारण केले. केबल नेटवर्कचे मुख्य केबल्स, बॅटरी युनिट्स आणि इतर महत्त्वाची उपकरणे जाळून खाक झाली. यात सुमारे २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. चिखली अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुमारे अर्ध्या तासात आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
यावेळी दत्ता खत्री, पार्थ व्यवहारे, अज्जू खान, मुजम्मील शेख, नीलय देशमुख, आकाश जैवाळ, अदनान खान तसेच राजा टॉवर गल्लीतील मित्र परिवाराने आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. घटनेनंतर सीसीएन केबल नेवटर्कची सेवा रात्री बंद पडली होती. मात्र २९ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत सदर सेवा पुन्हा सुरळीत सुरू केल्याचे सीसीएनचे
संचालक गोपाल तुपकर व माधव मोरमपल्ले यांनी सांगितले.