कुणाल संजय गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल! पोलिसांच्या ताब्यातून बोगस मतदाराला पळविण्यात केली होती मदत; बुलढाण्यात एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हे...
Dec 3, 2025, 10:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा नगर परिषदेचे कालचे मतदान खूपच गाजले.. संपूर्ण राज्यभर ज्या प्रकरणाची चर्चा झाली, त्या बोगस मतदान प्रकरणात एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या तावडीतून एका बोगस मतदाराला कुणाल गायकवाड यांनी पळून जाण्यासाठी मदत केल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता..अखेर शासकीय कामात अडथळा निर्माणव केल्याप्रकरणी कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेले आहेत.
प्रभाक क्रमांक ६ मध्ये जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतदान केंद्रावर एका बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले होते. तिथे कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांची एन्ट्री झाल्यानंतर त्या दोघांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभर व्हायरल झाला. दरम्यान प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मोताळा तालुक्यातील कोथळी येथून कथितपणे मतदानासाठी आलेल्या दोन संशितांना पकडले. प्राथमिक तपासणीत संशय निर्माण झाल्यास त्यांना पोलिसांच्या तावडे दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.
