अखेर देवखेड येथील मायलेकीचे प्रेत नदीपात्रात सापडले; दाेन दिवसांपासून हाेते बेपत्ता..!

 
 सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील २८ वर्षीय विवाहिता आणि तिची ४ वर्षाची मुलगी २९ सप्टेंबरपासून बेपत्ता हाेते. अखेर १ ऑक्टाेबर राेजी या मायलेकीचे प्रेत मराठवाड्यातील तळणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पूर्णा नदीपात्रात सापडले. 
 सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील निळकंठ भोसले यांची पत्नी गीता निळकंठ भोसले वय २८ वर्षे व मुलगी प्रियांशी भोसले
वय ४ वर्ष ही २९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेदरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता घरातन निघून गेली होती. याबाबतची तक्रार किनगाव राजा पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर या मायलेकीचा व दिवसभर परीसरात नातेवाईकांकडे शोध घेतला असता थांगपत्ता लागत नव्हता. तर १ आक्टोंबर रोजी या मायलेकीचा तळणी पोलीस स्टेशन हद्दीतील वाघाळा येथील पूर्णा नदीच्या पात्रात मुलीचा तर किरला येथे तिची आई या मायलेकीचे प्रेत आढळून आले. या प्रकरणी तळणी पोलीस स्टेशनला अकस्मिक मृत्यूंची नाेंद करण्यात आली आहे. याबाबत किनगाव राजा पोलीसांनी हरवल्याची नाेंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार संजय मोरतोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संतोष शेळके हे करीत आहेत.