साखरखेर्डात एफडीएची धडक कारवाई; १८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त दोन ठिकाणी छापे, संशयित फरार; गुन्हा दाखल
यानंतर पथकाने शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी धाड टाकली. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या १२ प्रकारच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत ११ लाख ३६ हजार १७० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन्ही कारवायांदरम्यान संबंधित संशयित घटनास्थळावरून फरार झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून, जप्त माल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह अन्य संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई पार पडली. एफडीए आणि पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कारवाईची माहिती समजताच साखरखेर्डा येथील अनेक पानटपऱ्या व किराणा दुकाने काही काळ बंद राहिल्याचे पाहायला मिळाले.