

बापरे.. पैशांच गथुड..!! खामगाव - शेगाव रस्त्यावरील अपघातग्रस्त क्रेटा कारमध्ये सापडली सत्तर लाखांची रोकड;दोघे पोलिसांच्या ताब्यात..!
Apr 8, 2025, 14:06 IST
खामगाव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव - शेगाव रस्त्यावर ६ एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील कारमध्ये ७० लाखांची रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
शेगाव वरून खामगाव कडे जाणारा दुचाकी स्वार,खामगाव वरून शेगावकडे येणाऱ्या क्रेटा कार मध्ये शनिवारी ५ एप्रिल रोजी दुपारी अपघात झाला होता. सुरज साहेबराव बोदडे (२५) वर्ष हा दुचाकी स्वार तरुण यामध्ये गंभीरित्या जखमी झाला होता.सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार क्रमांक एम एच २१ डीएफ ३४४४ चा मालक घटनास्थळावरून प्रसार झालेला होता.अपघातग्रस्त कार'मध्ये नोटांची थैली असल्याची माहिती जिल्हाभरात पसरली होती.
शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर क्रेटा कार'मध्ये नोटांची थैली ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला काल १ वाजेच्या दरम्यान आणली. रात्रीपर्यंत सदर रक्कम पोस्ट स्टेशनला तसेच पडून होती.सायंकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या मशीनद्वारे ही रक्कम मोजण्यात आली आहे.अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून याबाबतची अधिकृत माहिती पत्रकारांना दिली आहे. श्रेणिक लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली रक्कम ७० लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली आहे. या प्रकरणी कारचालक भागवत ज्ञानदेव आडेकर, नरेश खंडेराव गाडे दोघेही (रा.जालना)यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.पोलिसांनी सध्या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. नोटांसंदर्भात पुढील चौकशी सुरू आहे.