महसूल पथकावर जीवघेणा हल्ला अन् थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं! तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी देणारा एकलाऱ्याचा हर्षल अंभोरे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; २३ वर्षीय आरोपीला मोठ्या शिताफीने अटक...
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)/पटवारी संघटना तसेच कार्यालयीन कर्मचारी संघटनांनी कामबंद आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी फरार आरोपीला अटक केल्याने या प्रकरणात महत्त्वाची कारवाई झाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात पोउनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, पोलीस अंमलदार अमोल अंभोरे, मपोकॉ. पूजा जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास भोसले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. राजू आडवे, पोहेकॉ. पवन मखमले, पोकाॅ. ऋषीकेश खंडेराव आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे कैलास ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.