भिषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यु; २४ जखमी! खामगाव – शेगाव मार्गावरील आज पहाटेची घटना! बोलेरो एसटीबसवर धडकली, तिच्यावर लक्झरी धडकली..

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शेगाव मार्गावर आज पहाटे साडेपाच वाजता भीषण अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात ५ जणांचा घटनास्थळीत मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी प्रवासी बस, एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला आहे..

प्राप्त
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी लक्झरी प्रवासी बस अपघात ग्रस्त वाहनांना धडकली. या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ गंभीर जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खबर उडाली आहे...
Pikap
  प्राप्त माहितीनुसार अपघातातील भरधाव बोलेरो शेगाव कडून खामगाव कडे जात होती, एसटी महामंडळाची बस पुण्याकडून परतवाड्याकडे जात होती. बोलेरो आणि एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली, त्यानंतर शेगाव कडून येणारी लक्झरी बस या दोन वाहनांवर धडकली. या भीषण अपघातात तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे. अपघातामध्ये खाजगी लक्झरी बसचा चालक आणि वाहक केबिनमध्ये तासाभरापासून अडकला होता, अखेर त्याला बाहेर काढण्यात यश आला आहे..
Khamgaon