गौरींच्या आगमनादिनी शेतकरी पुत्राची आत्महत्या; नापिकी आणि वाढत्या कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल..!

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून 
शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी निमगाव येथे उघडकीस आली.संतोष मारुती बोरसे(वय ४५) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे.
याप्रकरणी मंगेश मारोती बोरसे वय ३४ वर्ष, रा. निमगांव यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.त्यामध्ये म्हटले आहे की, माझा भाऊ संतोष मारोती बोरसे वय ४५ वर्षे, निमगांव येथील शेख वकील शेख अन्सार खाटीक यांचे मालकीचे व वाडयातील रुम मधील छताचे लोखंडी पाईपला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसून आला. अशा फिर्यादीचे ताँडी रिपोर्ट वरुन नांदुरा पोलीस स्टेशनचे मपोहेकॉ. सरोदे यांनी मर्ग दाखल केला.
संतोष बोरसे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी, २ मुली, मुलगा असा बराच आप्तपरिवार असून निमगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक संतोष याचे वडीलाचे नावे ३ एकर शेती असून त्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा निमगाव चे अंदाजे ७०,८० हजार रुपये थकीत कर्ज असल्याने सतत होणारी नापिकी आणि त्यातच कर्जबाजारीपणा यामुळेच संतोष बोरसे याने आत्महत्या केल्याचे योगेश चावरे यांनी सांगितले. सदर घटनेमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.