सततच्या नापिकी, वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या...
Sep 24, 2025, 11:05 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जामुळे
स्थानिक भीमनगर येथील शेतकरी राहुल रामभाऊ मोरे (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मोरे हे २० सप्टेंबर रोजी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. मात्र सततच्या पावसामुळे शेतातील पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात दरवर्षीची नापिकी व कर्जाचा वाढता भार याला कंटाळून त्यांनी घरी परत येऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय जाधव व अनिल शिंदे करीत आहेत.