घरातील सदस्य बाहेर..चोरट्यांनी साधली संधी! दागिने घेऊन पोबारा; पिंपळगाव चिलमखाँ येथील घटना....
Sep 2, 2026, 14:57 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कपाट आणि लोखंडी पेटी फोडून ४६ हजार रुपयांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पिंपळगाव चिलमखाँ येथे ३१ ऑगस्ट रोजी भरदिवसा ही घटना घडली.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगाव चिलमखाँ येथील शेतकरी भानुदास शामराव खांडेभराड यांनी याबाबत तक्रार दिली. चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट आणि लोखंडी पेटी फोडून त्यातील रोकड व दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात ४६ हजार रुपयांची रोकड, सुमारे दोन ग्रॅम वजनाची आणि अंदाजे १० हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, तसेच लहान मुलाचे चांदीचे वाळे व अन्य साहित्य लंपास केले.