EXCLUSIVE बाब्बो...तरुणाईचा कल गुन्हेगारीकडे;बुलडाणा जिल्ह्यात क्राईम वाढतयं! मार्चच्या २४ दिवसांत ९८ आरोपी गजाआड; ओठांवर नुकतेच मिसरूड फुटलेले आरोपी सर्वाधिक...

 
 बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकेकाळी शांत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात आता गुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे..वाढती व्यसनाधीनता, वाढलेले अवैध धंदे यामुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे..अवैध धंद्यांना अभय दिल्यास त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो हे काल, २३ मार्चला अंढेरा पोलीस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्याच्या खुनावरून दिसले..दरम्यान "बुलडाणा लाइव्ह" कडे प्राप्त आकडेवारीनुसार बुलडाणा जिल्ह्यात मार्चच्या २४ दिवसांत ९७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.विशेष म्हणजे आरोपींमध्ये तरुणाईचा आकडा सर्वाधिक असल्याने ही चिंतनीय बाब आहे..
विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या ९८ आरोपींना बुलडाणा पोलिसांनी चालू महिन्यात अटक केली आहे. अटकेची कारवाई ही संबंधित पोलिस स्टेशन स्थरावर झालेली आहे,काही आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे देखील सहकार्य संबंधित 
पोलिस ठाण्यांना झालेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सर्वाधिक आरोपी ही १८ ते ३० या वयोगटातील असून तो आकडा ५० एवढा आहे..
वाढती व्यसनाधीनता आणि बेरोजगारी...
  सहज उपलब्ध होणारे इंटरनेट,सहज उपलब्ध होणारे अंमली पदार्थ यामुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे. तरुणाईचा आदर्श देखील गल्ली बोळात दहशत माजवणारा भाई आणि भाईगिरी ठरत आहे. जाणत्या वयात करिअर कडे लक्ष देण्याऐवजी तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याने ही बाब समाजासाठी चिंतनीय आहे..