EXCLUCIVE हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला..!लग्न जुळवण्यासाठी वरपित्यांचा आटापिटा; पोरी वाले म्हणतात, गव्हर्मेंट सर्विसवाला पाहिजे...
Updated: Dec 14, 2024, 13:50 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदाची लगीन सराई सुरू झाली आहे..त्यामुळे "आता काहीही करून यंदा उरकून टाकायचेच, यंदा जमवू..एखादी पोरगी पहा.." अशी वाक्ये लग्नाला आलेल्या तरुणांच्या वडिलांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.. नवऱ्या मुलांच्या कुटुंबाकडून लग्नाची घाई होत असली तरी नवरीवाले मात्र शांत आहेत.."आला चांगला तर करू, आमच्या पोरीचं काही वय नाही, अजून ती लहान आहे..आमच्या पोरीसाठी तीन चार नोकरीवाले येऊन गेले,पण आम्ही थांबलो" अशा गप्पा मुलीवाले मारत आहेत... एकंदरीत काय तर पोरीवाल्यांना सध्या प्रचंड मार्केट असून पोरावाले मात्र पोरगा करपून जातो की काय या चिंतेत आहेत.. सगळं आम्हीच करतो, आम्हाला हुंडा नको फक्त पोरगी द्या अशी विनवणी देखील पोरावाले करतांना दिसत आहे...
गावागावात लग्नाला आलेल्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत मुलींची संख्या दिसत नाही. परिवार विभागले असल्याने आता पूर्वीसारखी एकाच परिवाराकडे मोठ्या प्रमाणात शेती नाही. मात्र तरीही मुली वाल्यांना शेती आणि नोकरी या दोन्ही गोष्टी पाहिजे.त्यात आमची मुलगी शेतात जाणार नाही ही देखील अट असते. २५ वर्षाच्या पोराचे घर बांधलेले असले पाहिजे, तो नोकरीला पाहिजे, शेती पाहिजे अशा आवाक्याबाहेरच्या अटी मुलीवाल्यांकडून घातल्या जात आहेत, त्यामुळे समाजव्यवस्था अडचणीत आली आहे...
मुलीवाल्यांनो फक्त मुलगा पहा...
लग्न होत नसल्याने अनेक मुले तणावात आहेत, त्यांच्या कुटुंबीयांची देखील तीच अवस्था आहे. दुसऱ्याबाजूला चांगलं शोधण्याच्या नादात अनेक मुलींच्या संसाराचे वाटोळे झाल्याचे ही उदाहरणे आहेत. केवळ संपत्ती म्हणजे सर्व काही नाही. मुलगा सज्जन, निर्व्यसनी आणि पोटापुरते कमावणारा असला तरी मुलीवाल्यांनी विचार केला पाहिजे.अन्यथा केवळ शेती, संपत्ती, नोकरी पाहून मुलगी दिल्यावर देखील अडचणी निर्माण झाल्याची उदाहरणे समाजात आहेत....