

धाड मध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल...
Mar 22, 2025, 17:55 IST
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाड मध्ये चौघांनी सोशल मीडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण केले. पोलिसांनी शेख मुशीर शेख मुख्तार, शेख नसीर शेख निसार, शेख राजिक शेख अमर, फैजल हमीदखान शेख अशा चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धाड पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल राजू छोटूराम माळी यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. आरोपींनी त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवर औरंगजेबाचे उदात्तीकरण होईल असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंह, गुरुगोविंद सिंग तसेच इतर महापुरुषांचे चित्र एकत्रित करून त्यांना लहान आणि औरंगजेबाला महान दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. धाड पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .