नदीच्या पुरात वाहुन गेल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू; खंडाळा मकरध्वज येथील घटना; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह !
Sep 20, 2025, 12:20 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील खंडाळा मकरध्वज परिसरात १९ सप्टेंबर राेजी सायंकाळी जाेरदार पाउस झाला. या पावसामुळे गावातील नदी, नाल्यांना माेठा पूर आला हाेता. शेताची पाहणी करण्यासाठी ९० वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग हे नदीच्या पुरात वाहून गेले. ही बाब समाेर येताच प्रशासनाने त्यांचा शाेध सुरू केला हाेता. अखेर २० सप्टेंबर राेजी खंडाळा मकरध्वज ते शेलगाव जहाॅगीर दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला.
चिखली तालुक्यातील दाेन दिवसांपासून जाेरदार पाउस सुरू आहे.१९ शुक्रवारी सायंकाळी खंडाळा मकरध्वज परिसरात जाेरदार पाउस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आला. खंडाळा मकरध्वज येथील ९० वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग हे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परतले नाहीत. पुराच्या पाण्यात ठेंग हे वाहून गेल्याचे समाेर येताच प्रशासनाने त्यांचा शाेध सुरू केला. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबविली. मात्र अद्याप ठेंग यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार, ग्रामसेवक व तलाठी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले हाेते. अखेर २० सप्टेंबर राेजी ठेंग यांचा मृतदेह खंडाळा मकरध्वज ते शेलगाव जहाॅगीरदरम्यान,नदीपात्रात आढळला. या घटनेमुळे खंडाळा परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.